Thursday, January 22, 2026
HomeSanghtanaचंद्रपुरात " ओबीसी बचाव परिषद" पार पडली
spot_img

चंद्रपुरात ” ओबीसी बचाव परिषद” पार पडली

चंद्रपुरात ” ओबीसी बचाव परिषद” पार पडली

श्रेयश वानखेडे:

             पहिल्यांदाच राज्यभरातील ओबीसी संवर्गातील जातनिहाय संघटनांचे प्रतिनिधी दिनांक: 17/12/2023 ला ‘ओबीसी बचाव परिषदे’च्या निमित्ताने पूर्व विदर्भातील क्रांतीभुमी चंद्रपूर येथे एकत्र झाले.विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून आयोजित ओबीसी बचाव परिषदेत एकमताने मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. ओबीसीतील जातनिहाय संघटनांचा ‘रवि’सूर्य तळपला व ओबीसीकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्या ‘घुस’खोरांना चांगलाच शाब्दिक चोप जातनिहाय संघटनांनी त्यांच्या वक्तव्यातून दिला. त्यामुळे “ओबीसी बचाव परीषदे” ने सर्व संभ्रम दूर करीत उत्साहात व दणक्यात परीषद पार पाडली.

                ओबीसींची अराजकीय परीषद घेवून विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे हे कट्टर ओबीसीवादी असून सर्वसमावेशक आहेत व सर्वांना घेवून चालणारे आहेत असे निदर्शनास आले. एकप्रकारे ओबीसी सोबत कुरघोडी करू नये व दगाफटका करू नये, असा इशाराच या परिषदेने समाजातील वातावरण खराब करणाऱ्यांना दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर महाराष्ट्र पेटवू, ओबीसींच्या संयमाची व शांततेची परीक्षा घेवू नका, ‘ओबीसी खडा तो सरकारसे बडा’, हे लक्षात ठेवा, व जरांगेला जशास तसे उत्तर देवू, जरांगेला अटक करा, असे ओबीसी बचाव परिषदेने ठणकावून सांगितले आहे. यावेळी मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह ओबीसींची बिहारच्या धरतीवर जातनिहाय जनगणना सर्व्हे करा व इतर प्रचलित मागण्यांचे ठराव घेण्यात आले.

ओबीसी योद्धे रविंद्र टोंगे, प्रेमानंद जोगी, विजय बल्की, अक्षय लांजेवार, अजित सुकारे यांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले.या परिषदेत ओबीसी समाजातील बहुतांश जातसमुदायातील प्रतिनिधी उपस्थित होते. ओबीसीतील तेली, माळी, धनोजे कुणबी, तिरळे कुणबी, खेडूले कुणबी, खैरे कुणबी, मुस्लिम, धोबी, लोहार, मेरू शिंपी, पद्मशाली, कुंभार, गानली, भावसार, कोळी, भोई, नाभिक, सोनार, मयात्मज सुतार, गवळी, बेलदार, कापेवार, बारई, कलार, वंजारी, लिंगायत, धनगर, कुरमार, गोलकर आदी अनेक जातसमूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page