Monday, January 19, 2026
HomeSanghtanaपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात मग्न, जिल्ह्यातील नागरिक मात्र अनेक...
spot_img

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात मग्न, जिल्ह्यातील नागरिक मात्र अनेक समस्यांनी त्रस्त, राजू झोडे

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात मग्न, जिल्ह्यातील नागरिक मात्र अनेक समस्यांनी त्रस्त, राजू झोडे

सध्या जिल्ह्यात हे ना ते महोत्सव आयोजित केले जात असून नागरिकांच्या पैशाची खुलेआम उधळपट्टी करत आहेत.यात जिल्हा प्रशासनाची महत्वपूर्ण भूमिका असून सर्वच्या सर्वच अधिकारी कर्मचारी मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात व्यस्त आहेत.तर राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपुरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वतः नागरिकांच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करत असून सर्रासपणे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहेत. त्यामुळं जनतेच्या मूलभूत सोयीसुविधांकडे लक्ष देऊन नागरिकांचे काम करावे असे उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
जनतेच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन उत्सव साजरे करण्यात व्यस्त आहे. या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो,
उत्सवाच्या आडून कोट्यावधीच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जात असून जनतेच्या मनोरंजनाच्या नावाखाली उत्सव व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा अतिरेक होत आहे. चंद्रपूर महानगरपालिका बल्लारपूर पोंभुरणा व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध स्पर्धा व उत्सव यावर अनेक कोटी रूपयांची उधळपट्टी होऊन राहिली. लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने शासकीय अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात करोडो रुपयांची लूट करीत आहेत. विविध उत्सव आणि स्पर्धांचे आयोजन करून जनतेच्या डोळायात धूळ फेकण्याचा,जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही राजू झोडे यांनी म्हटले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page