बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी विचारपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण तसेच इतिहास विभागप्रमुख डॉ. किशोर चौरे व वरीष्ठ लिपिक श्री.प्रकाश मेश्राम होते.
एकोणिसावे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते,याच शतकात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली,महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्राथमिक शिक्षण मोफत व शक्तीचे करण्याचा विचार सर्वप्रथम मांडला, ते केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते समाजसुधारक होते, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रकाश मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. किशोर चौरे यांनी मानले तदपूर्वी डॉ. किशोर चौरे(इतिहास विभागप्रमुख) आपले विचार व्यक्त करतांना म्हणतात की, महात्मा ज्योतिबा फुलेंना उचवर्णीयांनी त्रास देण्यास कुठलीच कमतरता ठेवली नाही, म्हणून बहुजनांच्या उन्नतीसाठी केवळ शिक्षणच हा पर्याय आहे म्हणून त्यांनी बहुजनांच्या शिक्षणाच्या उन्नतिकडे लक्ष दिले, लॉर्ड मेकॉले नी जो शिक्षणविषयक भारतामध्ये झिरप सिद्धांत मांडला होता की, उच्चवर्णीयांना शिक्षण दिले तर समाजातील खालच्या वर्गापर्यंत शिक्षण झिरपत जाईल परंतु उच्चवर्णीयांनी समाजाच्या खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोहचू दिले नाही, त्यांनी ते वरच्या वर अडविले,म्हणून महात्मा फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे.असे विचार व्यक्त केले,या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.