कुणबी युवक आक्रमक, लोकसभेच्या बिगुलानंतर शांत बसलेला कुणबी युवक जागरूक

बल्लारपूर येथील चर्चित कुणबी युवक प्रणय काकडे व त्यांच्या चमू यांनी केलेले कुणबी युवक संघटनेची मोर्चे बांधणी सध्या बल्लारपूर तालुक्याचा महत्वाचा विषय समजल्या जात आहे. समाजातील युवकांच्या माहितीने असे लक्षात येत आहे कि, युवकांना निवडणुकी संदर्भ संपूर्ण गुपित प्रशिक्षण ऍड. प्रणय काकडे व त्यांच्या चमू यांनी दिलेले आहे. प्रत्येक बुतची विवरचना करून कुणबी युवकांना बूत मजबूतीची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक युवकांना जबाबदारी वाटण्यात आली आहे. अशी माहिती सूत्राने दिलेली आहे. प्रचंड युवकांच्या संपर्कात असणारे ऍड. प्रणय काकडे सक्रिय होताच मत परिवर्तनाची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण बाबीमुळे धानोरकर यांना मोठ्या मतांचा पाठिंबा मिळणार.






