घाटंजीचा निश्चित विकास करणार – ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन
‘विकास म्हणजे सुधीर भाऊ’ या घोषणांनी निनादले घाटंजी
जन-आशीर्वाद यात्रेला भरघोस प्रतिसाद




काँग्रेस हा सेटिंग -फिटिंगचे राजकारण करणारा पक्ष आहे. परंतु, आपल्याला जर खरा विकास हवा असेल तर सर्वांनी कमळाचे बटन दाबायला हवे, असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. घाटंजीचा विकास निश्चित करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
घाटंजी येथे , 16 एप्रिल रोजी विकासपुरुष ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जन-आशीर्वाद पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
काँग्रेसला सत्ता दिल्यावर त्यांनी जनतेसाठी काहीच काम केले नाही, असे सांगून ना. मुनगंटीवार यांनी काँग्रेसचा खरमरीत समाचार घेतला. या उलट जर महायुतीला निवडून दिले तर शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला जाईल, असे ते म्हणाले.
‘विकास म्हणजे सुधीरभाऊ’
भगवा ध्वज, कमळ आणि सेल्फी






