Wednesday, July 29, 2026
spot_img
HomePoliticalतैलीक युवा/महिला एल्गार संघटनेकडून राजेश वारलुजी बेले यांना पाठिंबा!

तैलीक युवा/महिला एल्गार संघटनेकडून राजेश वारलुजी बेले यांना पाठिंबा!

तैलीक युवा/महिला एल्गार संघटनेकडून राजेश वारलुजी बेले यांना पाठिंबा!

तैलीक युवा/महिला एल्गार संघटनेने आज एका बैठकीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश वारलुजी बेले यांना तेली समाजाचे उमेदवार म्हणून निवडले आहे आणि त्यांना संघटनेकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

बैठकीत जिल्हाध्यक्ष जितेंद्र नानाजी इटनकर यांनी राजेश वारलुजी बेले यांच्या उमेदवारीला एकमताने पाठिंबा दर्शवला.  इटनकर यांनी बेले यांना तेली समाजाचे हक्क आणि कल्याण यासाठी लढणारे एक मजबूत आणि समर्पित नेता म्हणून वर्णन केले.

इटनकर म्हणाले, तैलीक युवा/महिला एल्गार संघटना सर्व समाजाला घेऊन दरवर्षी संत जगनाडे जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करीत असते. त्यामुळे समाजातील सर्व पक्षात असलेल्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी पक्षभेद विसरून आपल्या समाजाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. असे आव्हान केले आहे
“राजेश वारलुजी बेले हे एक प्रगतीशील आणि दूरदर्शी नेता आहेत आणि ते तेली समाजाचे हक्क आणि कल्याण यासाठी लढण्यास वचनबद्ध आहेत.  आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होतील आणि तेली समाजाचे आवाज दिल्लीत उठवतील.

इटनकर यांनीतेली समाजातील सर्व मतदारांना राजेश वारलुजी बेले यांना मोठ्या प्रमाणावर मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. या बैठकीला तैलीक युवा/महिला एल्गार संघटनेचे अनेक सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी  पाठिंबाला गृहीत धरू नये.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page