Shreyash Wankhede:
बल्लारपुर पोलीसांनी राजेंद्र प्रसाद वार्डात दारुचा साठा पकडला असून २९,२०० रुपये चा मुद्देमाल जप्त केले.
बल्लारपूर पोलीस प्रोव्हीशन व जुगार रेड कामी पेट्रोलींग करित असतांना गोपनिय माहिती वरुन डॉ. राजेंद्र प्रसाद वार्डातील अर्चना राऊत हिचे घराची झडती दरम्यान बल्लारपूर पोलीसांनी रेड कारवाई केली असता किंमत अंदाजे ७०००/-रु. दोन काळया रंगाच्या स्कुल बॅगमध्ये एकूण-२०० नग रॉकेट संत्रा देशी दारु कंपनीच्या प्रत्येकी ९० एम.एल. नी भरलेल्या प्लास्टीक सिलचंद बॉटल व २२,२००/-रु. दोन काळया रंगाच्या स्कुल बॅगमध्ये १२ नग रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की कंपनीच्या विदेशी दारु असा एकुण २९,२००/-रु. त्ता माल पकडला.
आरोपी महिला नामे अर्चना प्रमोद राऊत वय २५ वर्षे रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू , दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, सफौ गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पुरुषोत्तम चिकाटे, वशिष्ट रंगारी, शरदचंद्र कारुष, मिलींद आत्राम, शेखर माथनकर व मपोअं. सिमा पोरते इ. स्टॉफ यांनी केली आहे.