ब्रह्मपुरीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत, नागरिकांची महत्वपूर्ण मागणी
श्रेयश वानखेडे:
शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात राहुल भोयर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देऊन त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
राहुल श्रीराम भोयर, संपादक, ब्रम्हपुरी दर्पण यांनी मुख्याधिकारी नगर परिषद आणि पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ब्रह्मपुरी शहरातील अनेक ठिकाणी शासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु, हे कॅमेरे २२ जून २०२२ पासून केबल खराब झाल्याने बंद आहेत. त्यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी हे कॅमेरे त्वरित दुरुस्त करणे अथवा नव्याने बसविणे अत्यंत आवश्यक असल्याने शहरातील चौकात पोलीस स्टेशन अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहेत ते दुरुस्त करण्याची मागणी केलेली आहे.
*सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फायदे*
1. *चोरी आणि घरफोडीवर नियंत्रण* सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रोफेशनल चोरी किंवा घरफोडी करणारे लोक ओळखले जाऊ शकतात. पोलिसांना त्यांना पकडणे सोपे होते, कॅमेरा असल्याने गुन्हेगार चोरी करण्याच्या विचारापासून परावृत्त होऊ शकतात.
2. *वाहतूक नियमांचे उल्लंघन* सीसीटीव्ही कॅमेरा गाड्यांचे नंबर प्लेट्स वाचू शकतो, ज्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक करता येते, अपघातांची कारणे आणि अपघातात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवता येते.
3. *सार्वजनिक ठिकाणी होणारे गुन्हे* कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी झालेल्या मारामाऱ्या किंवा हिंसाचाराची तपासणी करता येते, महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि छेडछाडांच्या घटनांवर नियंत्रण ठेवता येते.
4.*अवैध औषधविक्री* अवैध औषधविक्री आणि ड्रग्स विक्री करणाऱ्या लोकांना पकडने सोपे होऊ शकतो.
5. **खनिजांची अवैध वाहतूक** अवैध गौण खनिजांची वाहतूक पकडणे सोपे होते. ट्रक किंवा अन्य वाहनांची तपासणी करता येते, खाणकामाच्या क्षेत्रांमध्ये होणारी चोरी कमी करता येते.
6. *सार्वजनिक सुव्यवस्था राखणे*
कोणत्याही आपत्ती किंवा अनावश्यक घटनांच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजमुळे परिस्थितीची वास्तविक माहिती मिळते, मोठ्या जमावाच्या वेळी सीसीटीव्हीमुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रित ठेवता येते.
*निष्कर्ष:-* शहरातील चौकात पोलीस स्टेशन अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने चोरी, घरफोडी, वाहतूक उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी होणारे गुन्हे, औषधविक्री, आणि गौण खनिजांची चोरी यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. तसेच, यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढते आणि गुन्हेगारांना पकडणे सोपे होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून एक सुरक्षित आणि सुव्यवस्थित समाज निर्माण करता येणे सोपे होते.
*साध्य काय करता येईल?*
*निर्भय वातावरण तयार होईल व लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल, पोलिसांची कार्यक्षमता प्रभावी होऊन पोलिसांना गुन्ह्यांची तपासणी करणे आणि गुन्हेगारांना पकडणे सोपे होते, गुन्हेगार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उपस्थितीमुळे गुन्हे करण्यास घाबरतात यामुळे अपराध दर कमी होईल.