Saturday, March 14, 2026
HomeFraudमृत शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बोगस नियुक्त्या
spot_img

मृत शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बोगस नियुक्त्या

मृत शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बोगस नियुक्त्या

नागपूर जिल्हा परिषद मधील प्रकार

Shreyash Wankhede:
महाराष्ट्र मध्ये काही जिल्ह्यात शिक्षण अधिकाऱ्यांच्या जिवंतपणी बोगस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या, अनुकंपधारकांच्या नियुक्त्या झालेल्या असताना, नागपूर जिल्हा परिषद येथे आठ वर्षांपूर्वी कार्यरत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सोमेश्वर नेताम जे आता मृत आहेत. त्यांच्या स्वाक्षरीचा वापर करून बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्याच्या चर्चा सुरू आहे. नागपूर जिल्हा परिषदेत सदर प्रकारचे रॅकेट कार्यरत असून संस्थाचालक आणि संबंधित अधिकारी यांच्या संगणमताशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही. बोगस नियुक्त्या उघडकीस येऊ नये म्हणून शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद नागपूर यामधील फाईल कार्यालयातून गहाळ झाल्याची चर्चा सुरू आहे. मृत शिक्षणाधिकारी सोमेश्वर नेताम  यांच्या बनावट स्वाक्षरी च्या आदेश्वाद्वारे नागपूर जिल्ह्यातील अनेक शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करीत असून, त्यांनी मागील काही वर्षापासून पगार घेतलेला आहे तसेच वेतन आणि इतर लाभ प्राप्त करून शासनाला कोट्यावधी रुपयांनी गंडविले आहे. या सर्व नियुक्त्यांना शालार्थ आयडी शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे प्रदान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय 2 मे 2012 अनुसार शिक्षक भरतीस निर्बंध असताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे बोगस आदेश काढण्यात आले.याबाबत माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की याबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page