श्रेयश वानखेडे:
मोहरमच्या पवित्र निमित्ताने हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ ब्रह्मपुरी शहरात 17 जुलै रोजी सायंकाळी परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात आली. शोएब बाबा यांच्या बंगल्यापासून हजरत नाले हैदर नाल साहिब यांची मिरवणूक निघाली. गावातील विविध ठिकाणांहून मिरवणुका निघून शहरात गस्त घालून आपापल्या ठिकाणी पोहचल्या.
मोहरमच्या निमित्ताने निघणाऱ्या या मिरवणुकीने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दर्शवले. या मिरवणुकीत सर्व धर्मीयांनी उत्साहाने सहभाग घेतला. विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन शांतता आणि एकोपा दर्शवला. मोहरमच्या निमित्ताने आपल्याला मिळालेला संदेश हा की, विविधतेत एकता ही आपल्या समाजाची खरी ओळख आहे.
मिरवणूक आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश हा हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाचा आदर करणे तसेच समाजात धार्मिक सहिष्णुता आणि ऐक्य निर्माण करणे हा आहे. अशा कार्यक्रमांमुळे विविध समाजातील लोक एकत्र येऊन परस्परांशी संवाद साधतात, ज्यामुळे समाजातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
अशा पवित्र प्रसंगांमुळे समाजात शांतता, प्रेम, आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते. मोहरमच्या निमित्ताने आपल्या समाजात हा संदेश पोहचतो की, एकमेकांशी मिळून-मिसळून राहण्याने समाज अधिक सक्षम आणि सुसंस्कृत होतो.