Monday, January 19, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपूर येथे नझुल धारकांना पट्टे देणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात
spot_img

बल्लारपूर येथे नझुल धारकांना पट्टे देणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात

बल्लारपूर येथे नझुल धारकांना पट्टे देणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात

श्रेयश वानखेडे:

मा. ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या पुढाकारातून ” नझुल धारकांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिये” ची सुरुवात दि.६/८/२०२४ रोज मंगळवार ला मा.श्री चंदन सिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ म.रा. यांच्या प्रमुख उपस्थितीत साईबाबा वॉर्ड, शिवाजी वॉर्ड बल्लारपुर येथून झाली.या वेळी आदरणीय चंदनसिंह चंदेल यांनी नागरिकांना सदर प्रक्रिया हि मा.पालकमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारातून होत असुन याकरिता नागरिकांना कोणतेही हाल कष्ट न देता संबंधित एजन्सीला सहकार्य करून आपली प्रक्रिया पूर्ण करून घेण्याकरिता आवाहन केले.दरम्यान नागरीकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडु नये तसेच कोणीही भ्रम पसरविण्याचे काम करत असेल तर त्याची तात्काळ दखल घेऊन भाजपा कार्यालय किंवा भाजपा नेत्यांना कळवावी.ही पट्टे वाटप प्रक्रिया प्रथम चरणात फक्त नझुल धारकांसाठी आहे.या प्रसंगी अनेक प्रश्नात्मक अडचणीला श्री चंदन सिंह चंदेल यांनी पूर्णतः सोडवण्याचे नागरिकांना आश्वासीत केले.सदर प्रक्रिया ही संपुर्ण शहरात राबविण्यात येणार असुन लवकरात लवकर नझुल धारकांना जमीनीचे पट्टे देण्यात येईल ज्यामुळे त्यांना केंद्राच्या व राज्य सरकार च्या योजनांचा लाभ घेता येईल.या वेळी भाजपा शहर अध्यक्ष श्री काशिनाथ सिंह, शहर सचिव इंजि. देवेंद्र वाटकर,माजी नगरसेविका सौ.सुवर्णा भटारकर,भाजप नेता श्री अरुण भटारकर,श्री किशोर मोहुर्ले, डॉ. अनिल बोम्मावार,सौ.शालू कुमरे,बुथ प्रमुख- राहुल कोत्तावार,विशांक ठाकुर,राहुल चौहान भाजपा कार्यकर्ता मनोज बहुरिया, नयन बोम्मावार,प्रिझम वाढई,नंदू कोणपट्टीवार,सुरज टपाले,स्वप्नील टपाले व अन्य कार्यकर्ता आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page