श्रेयश वानखेडे:
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकर नाईक यांचा वारसा लाभलेल्या जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुसद येथील डॉ एन पी हिराणी पॉलीटेक्निक च्या कर्मचाऱ्यांना नागपूर उच्च न्यायालयाने दिलासा प्रदान केला. न्यायमूर्ती चांदवाणी यांनी संस्थेचे अध्यक्ष जय सुधाकर नाईक यांना २६ लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे. काही वर्षांपूर्वी जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ एन पी हिराणी पॉलीटेक्निक पुसद बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. परंतु कर्मचारी यांनी संस्था बंद करण्यास विरोध केला. कर्मचारी यांनी संस्था बंद करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे संस्था बंद करता आली नाही. त्यानंतर कर्मचारी यांनी वेतन थकबाकी करिता उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च उच्च न्यायालयाने वेतन थकबाकी व्याजासह देण्याचे निर्देश दिल्यावर व्यस्थापनाने त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले परंतु निर्णय कायम राहिला व प्रकरण पुन्हा उच्च नायालयात वर्ग करण्यात आले. एकूण १४ करोड रुपये थकबाकी पैकी व्यस्थापनाने ३ करोड थकबाकी अदा केली आहे. उच्च न्यायालयाने संस्थेची संपत्ती विकून उर्वरित थकबाकी अदा करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहे .