Shreyash Wankhede:
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तर्फे आयोजित चंद्रपूर जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत 14 वर्षे आतील मुली व 17 वर्षे आतील मुले यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपले नाव लौकिक केलेले आहे. विद्यार्थी फुटबॉल खेळामध्ये तरबेज असून नेहमी उत्कृष्ट कामगिरी बजावत असतात व आपला प्रथम स्थान कायम ठेवत असतात शाळेतील उत्तम शिक्षणासोबतच शाळेत शालेय खेळाला सुद्धा तेवढेच महत्त्व दिले जाते व शाळेत विविध उपक्रम राबविला जातात. अशा अनेक खेळांमध्ये विद्यार्थी प्राविण्य प्राप्त करत असतात.मुली टीम कॅप्टन कांक्षा रामील्ला, मुले टीम कॅप्टन आयुष माकोडे यांनी येणाऱ्या 24 व 25 सप्टेंबरला वर्धा येथे होणाऱ्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत सहभागी होऊन उत्तम कामगिरी बजावणार असा विश्र्वास दर्शविलाआहे.विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय शाळेतील क्रीडा शिक्षक ए दयानंद सर किशोर मोहुर्ले सर, रोहिणी वालोकर तसेच आपल्या आई-वडिलांना दिले. शाळेतील मुख्याध्यापक ब्रदर प्रेम कुमार, उप मुख्याध्यापक ब्रदर किशोर, ब्रदर जेरोम व शिक्षक गण यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.