Tuesday, June 16, 2026
HomeChandrapurतथ्य समोर आणणे हेच आमचे कर्तव्य- मान. मंजुषा भोसले
spot_img

तथ्य समोर आणणे हेच आमचे कर्तव्य- मान. मंजुषा भोसले

तथ्य समोर आणणे हेच आमचे कर्तव्य- मान. मंजुषा भोसले

श्रेयश वानखेडे:
दिनांक: 27/09/ 2024 रोजी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर येथील जे कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या धाडीत सापडल्या गेले. त्यांचा पीसीआर समाप्त झाला असून, एमसीआर सुद्धा समाप्त झाला आणि ते बेलवर सुटलेले आहेत.
   त्यांच्याकडून जी माहिती आमच्या हाती लागली त्या दिशेने आमचा तपास सुरू आहे. अशी माहिती मान. मंजुषा भोसले उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग चंद्रपुर यांनी दिनांक: 03/10/ 2024 रोजी दिली. भ्रष्टाचाराचे जे मोकळं रान होतं, त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे हेच आमचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितले.
      यात त्यांनी हे सुद्धा सांगितले की कोणी कोणाची  काहीही माहिती प्रकाशित आणि प्रसारित करीत असेल तर असेल तर तो आमचा भाग नाही. आम्ही आमच्यातर्फे शिक्का स्वाक्षरी मारून ऑथेंटिक माहिती देत असतो आणि ती प्रकाशित करावी. हीच आमची अपेक्षा असते.
आम्ही कोणावर दबाव टाकत नाही किंवा त्यांना भीतीचे वातावरण निर्माण करीत नाही. हे प्रकरण बंद झालेले नसून योग्य दिशेने तपास सुरू आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page