Saturday, December 6, 2025
HomeElectionमहाविकास आघाडी ला महाराष्ट्रात सत्तेवर आणा : काँग्रेस नेते कन्हैया कुमार
spot_img

महाविकास आघाडी ला महाराष्ट्रात सत्तेवर आणा : काँग्रेस नेते कन्हैया कुमार

महाविकास आघाडी ला महाराष्ट्रात सत्तेवर आणा : काँग्रेस नेते कन्हैया कुमार 

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जनतेसाठी पाच योजना राबविण्याची घोषणा केली, त्यापैकी तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील, तेलंगणा राज्य प्रमाणे प्रत्येक कुटुंबासाठी पंचवीस लाखांचा विमा लागू केला जाईल. राज्यात सर्व महिलांना बसची सुविधा मोफत दिली जाईल, प्रत्येक बेरोजगार बांधवाला दरमहा ४ हजार रुपये मिळतील, अशा आशयाचे मनोगत काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
           वस्ती विभागातील महात्मा गांधी पुतळा जवळ आज महाविकास आघाडी चे उमेदवार संतोष सिंह रावत यांचा प्रचार कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की  २०२४ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरणार असून या निवडणुकी कडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेले असून महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे मॉडेल आहे. व्यक्तींच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यापेक्षा अमूर्त वस्तूना उध्वस्त करून पुनरनिर्माण करणे म्हणजे विकास होय का असा प्रतिप्रश्न ही विचारला आम्ही धर्माला जरी पूजत असलो तरी लोकशाही व संविधान या समता, स्वातंत्र्य बंधुता या तत्वाचंही पालन करतो म्हणून आपण सर्व मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणून पुरोगामी विचारांना बळकट करण्याचं आवाहन सुध्दा कन्हैया कुमार यांनी केले.
            या प्रचार सभेला महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत, महाराष्ट्र काँग्रेस चे प्रभारी सूर्यप्रभा चेट्टीयार,  माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, घनश्याम मुलचंदानी, प्रदीप गेडाम, पवन भगत, रिपब्लिकन नेते अशोक निमगडे आदींनी संबोधित केले. या वेळी मंचावर ॲड. बाबासाहेब वासाडे, शहर काँग्रेस चे अध्यक्ष अब्दुल करीम भाई, बादल उराडे, डॉ. अनिल वाढई, डॉ. सुनील कुलदीवार, राजेंद्र वैद्य, दिलीप माकोडे, भास्कर माकोडे, ॲड. मेघा भाले, अफसाना सय्यद आदींची उपसथिती होते. सभेचे संचालन देवेंद्र आर्य यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page