Shreyash Wankhede:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. बी. बी. भगत मुख्याध्यापक, तर प्रमुख पाहुणे श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, श्री. यु. के. रांगणकर सर यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थिनी कु. आराध्या वेले, कु. शिक्षा रामटेके, कु. अनुष्का दुर्गे, कु. रूपाली निमकर, कु. त्रिशाली महानंद
यांनी संविधानाबाबत माहिती दिली.
प्रमुख पाहुणे श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी संविधान प्रणाली बाबत माहिती विशद केली. श्री रांगणकर सर यांनी सांगितले की, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील आहे. त्यामुळे या देशात संस्कारीत आणि मजबूत पाया असलेला नागरिक तयार होतो. अध्यक्षीय भाषण श्री. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले.
प्रास्ताविक श्री. आर. के. वानखेडे, संचालन श्री. आर. बी. अलाम आणि आभार प्रदर्शन श्री. एस. एम. चव्हाण सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. जगदीश कांबळे, श्री. वामन बोबडे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री. इंद्रभान अडबाले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.