पुन्हा एकदा बल्लारपूर पोलिसांनी बल्लारपूर पोलीस ठाणे हद्दीत एकूण-02 तलवारी पकडल्या

श्रेयश वानखेडे:
उल्लेखनीय कामगिरी अशी की, पोलीस ठाणे बल्लारपूर हद्दीतील मौजा- भगतसिंग वार्ड, बल्लारपूर येथे मुखबिरच्या खबरेवरून कारवाई करून आरोपी नामे- कमल रामचंदन वर्मा वय- 21 वर्षे रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर जि. चंद्रपूर याचे ताब्यातून एकूण-02 नग धारदार तलवार जप्त करून पोलीस ठाणे बल्लारपूर गुन्हा रजिस्टर क्रमांक 1111/ 2024 कलम-4/ 25 आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीतांना दिनांक: 14/12/ 2024 ला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मान. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, मान. अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू मॅडम, श्री. दीपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील वि. गाडे, सपोनि ए. एस. टोपले, पोउपनि हुसेन शहा, सफौ. गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, पोअं विकास जुमनाके, शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन चव्हाण, खंडेराव माने, मिलिंद आत्राम, भास्कर चिचवलकर इत्यादी स्टाफ यांनी केली आहे.