Sunday, April 19, 2026
Homeबल्लारपूरनळ मीटर बंद चा नावाने नळ धारकांची आर्थिक लूट
spot_img

नळ मीटर बंद चा नावाने नळ धारकांची आर्थिक लूट

नळ मीटर बंद चा नावाने नळ धारकांची आर्थिक लूट

श्रेयश वानखेडे :-महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे शहरात पाणी पुरवठा होत आहे. त्याकरिता मजीप्रा कडून नळ धारकांना मीटर ची रिडिंग घेऊन बिल देतात. पण या महिन्यात मीटर बंद आहे असे शेरा लिहून ६०० रुपये बिल नळ धारकांना पाठविले असून नळ धारकांची आर्थिक लूट होत आहे.

      बल्लारपूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून नागरिकांना पाणी पुरवठा होत असून जास्तीत जास्त घरी नळ जोडणी आहे. नळ धारकांना कमीत कमी २१० रुपये बिल येते. पण या महिन्यात मीटर बंद आहे असे शेरा लिहून ६०० रुपये बिल पाठविले आहे. त्यामुळे नळ धारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नळ ग्राहकाने या बाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे शाखा अभियंता यांना विचारले असता तुमचे मीटर बंद असून तुम्हाला नवीन मीटर घेऊन लावा लागेल. आता नवीन मीटर ला सुद्धा पैसे मोजावे लागणार. शहरात २५०० पेक्षा नळ धारकांना जास्त बिल पाठविल्याचे माहिती मिळाली. पुष्कळ लोकांचा घरी बोअरवेल असून नळाचे जास्त वापर होत नाही. त्यामुळे त्यांच्या नळाच्या मीटर चे आकडे फिरत नसून एक युनिट सुद्धा पाण्याचे वापर होत नाही. तरी सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने फॉल्टी मीटर शेरा देऊन जास्त बिल पाठविले आहे. आता नळ धारकांना नवीन मीटर घेऊन लावा लागेल. मागील वर्षी मजीप्रा ने सर्व नळ धारकांना नवीन मीटर लावून दिले होते. आता नवीन मीटर लावण्याकरिता नळ धारकांना आर्थिक भुर्दंड होणार आहे. अगोदर सुद्धा मजीप्रा कडून असेच होत होते. मजीप्रा कडून लावलेले मीटर इतक्या लवकर कसे नादुरस्त होते हे कोड नळ धारकांना समजायला वेळ लागले नाही.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page