Saturday, December 6, 2025
HomeEducationमाध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माहिती अधिकाऱ्याद्वारे मनमानी सुरू
spot_img

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माहिती अधिकाऱ्याद्वारे मनमानी सुरू

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माहिती अधिकाऱ्याद्वारे मनमानी सुरू

वारंवार करत आहे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन, जिल्हाधिकाऱ्यांनी कान टोचले

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर या कार्यालयाच्या ठिकाणी  माहिती अधिकारी कार्यरत आहे. त्यांनी राज्य माहिती आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे सुरू केले  असून कार्यालयात  सुद्धा माहितीच्या अधिकारात दिरंगाई करत असल्याची चर्चा सुरू आहे.
शिक्षण अधिकारी पदावर कार्यरत असताना माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी  हे दोन्ही पदे स्वतः सांभाळत असल्याने पैसे खाणे हाच मुख्य धंदा सुरू होता ऐसे ऐकवल्या जात आहे. यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये माहितीच्या अधिकाराकडे साफ- साफ दुर्लक्ष केले असल्याची घटना समोर आलेली आहे. पैसे खाण्यासाठी यांनी बल्लारपूरच्या एका शाळेतील दलाल, चंद्रपूरच्या शाळेतील दोन दलाल व आपल्या नातेवाईकाचे खास दोन दलाल अशाप्रकारची रेलचेल हे कार्यरत असताना ऑफिसमध्ये वारंवार चक्कर मारून मलाई देत होते.
ऑफिस मधल्या प्रत्येक कामात पैसे खाल्ल्याशिवाय कोणतीच फाईल समोर जात नव्हती. जसं काही यांच्या कार्यालयात …… हॉटेल चालत आहे का? असा प्रश्न  संबंधित येरझाऱ्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर उपस्थित झाला होता, त्याचा परिणाम हा झाला की, एकाच वेळी यांच्या कार्यालयाचे तीन कर्मचारी रात्रभर चड्डी बनियानवर रामनगर पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये बंद झालेत.
माहितीचा अधिकार कायद्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वारंवार माहितीच्या अधिकार कायद्याचे उल्लंघन  यांच्याकडून होत असल्याची चर्चा सुरू आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page