Saturday, December 6, 2025
HomeJayantiमहिलांनी आपल्या हक्क अधिकाराची लढाई स्वतः लढावी -डाॅ अभिलाषा गावतुरे
spot_img

महिलांनी आपल्या हक्क अधिकाराची लढाई स्वतः लढावी -डाॅ अभिलाषा गावतुरे

महिलांनी आपल्या हक्क अधिकाराची लढाई स्वतः लढावी -डाॅ अभिलाषा गावतुरे

श्रेयश वानखेडे:

3 जानेवारी 2025 ला भूमिपुत्र महिला ब्रिगेड व मुक्ता युवा वाहिनी बल्लारपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर येथील गोंडवाना नृत्य सभागृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मां फातिमा शेख यांच्या जयंती निमित्य संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून लाभलेल्या मान. डॉ. रजनी हजारे, मान. प्रकृती पाटील मॅडम अंधश्रद्धा निर्मूलन, कविता मडावी मॅडम, तबस्सूम अन्सारी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. अभिलाषा गावतुरे मॅडम, सविता पवार, फातिमा तनवीर अली, वनिता रायपुरे, अनिता पंधरे, डॉ. शालिनी मटाले, डॉ. ज्योती डांगे, ऍड. प्रिया झांबरे, रश्मी बारसागडे, रोजीदा ताजुद्दीन  शेख, ऍड. रोहिनी कुळमेथे उपस्थित होत्या.

प्रथम सावित्रीबाई फुले व मां फातिमा शेख यांच्या फोटोला पुष्पहार वाहून व सर्व महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन केल्या गेले नंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्या गेले. प्रास्ताविक भाषण अमोल वर्मा  यांनी केले. डॉ. रजनी हजारे मॅडम यांनी स्त्रियांना संबोधले. तब्ससूम अन्सारी प्रिंसिपल मॅडम यांनी आजची स्त्री यावर बोलल्या. कविता मडावी मॅडम यांनी स्त्री व आजची आव्हाने या विषयावर मत मांडले. नंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांना त्यांच्या केलेल्या कार्यास प्रोत्साहन म्हणून भूमिपुत्र ब्रिगेड यांचे कडून शॉल व सन्मान चिन्ह देऊ केले. मुलींनी नाटक आणि नृत्य सादर करून उपस्थितांचे मन ओढून घेतले. अध्यक्षिय भाषणात डॉ. गावतुरे मॅडम यांनी स्त्रियांना सन्मानाने जगण्यास व आजची आव्हाने पेलण्यास सक्षम व्हा असे सांगितले व आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवि देवगडे यांनी केले, ताहीर हुसेन, अमोल वर्मा, अतिक शेख, साजिद शेख, अनिस खान, आबिद शेख, पुजा मून, छब्बू खोब्रागडे, देशभ्रतार, संध्या कोरडे, निशिगंधा ढेंगरे, हर्ष्या ढेंगरे, प्रणाली ढोके, करुणा शेगावकर, तंजीला सय्यद, संजीदा बाजी, अर्शीया बाजी, लता नागोसे, पूजा मोहुर्ले, वैशाली चिवंडे आदी उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page