Sunday, December 7, 2025
HomeLekhअर्णव बुरघाटे इयत्ता 6 वी कडून पुनरावलोकन.
spot_img

अर्णव बुरघाटे इयत्ता 6 वी कडून पुनरावलोकन.

अर्णव बुरघाटे इयत्ता 6 वी कडून पुनरावलोकन.

मी USA मधून INDIA ला माझ्या फॅमिली ला भेटायला आलो आहे. मी अनुभव केलं की, भारत हा इतर देशा पेक्षा खूप बाबतीत वेगळा आणि छान आहे. मी USA पेक्षा भारतात स्वतः करता  फ्रीडम अनुभवला. मी खूप मोकळ्या मनाने मित्रांसोबत खेळलो आणि फिरलो.

मी इथे दुकानात जाऊन स्वतः चॉकलेट्स आणि इतर समान विकत घेतो. ते मला खूप आवडलं. USA ला अस नसत. इथे वेजिटेरियन आणि नॉन वेजिटेरियन खाण्यात खूप व्हेरायटी आहेत. स्ट्रीट फूड मधे पण खूप प्रकार आहेत. पण इथे खूप धूळ असल्याने मी नाराज झालो.

रस्त्याने फिरताना खूप गर्दी वाटली पण खूप वाहतूक असते. वेगाने आणि अनियमित पद्धतीने गाड्या जातात, भिती वाटते. मुल एकटे फिरतात तर त्यांना दुर्घटना होऊ नये म्हणून नियम हवे. तिकडे Parents सोबत असतात. वाहतूक हे थोड ठीक केलं तर मग इंडिया बेस्ट च आहे.

USA ला मला सहाविला पाच विषय आहेत. तिथे लो स्कोअर आले तर Retake देतात. बुक रीडिंग, Own experience, Own words , यावर भर देतात. Good habits, Manners, शिकवतात.

तिथे कुणी भांडत नाही. आणि कुणाला कमी लेखत नाही. Competition असते पण ती स्वतःची ग्रोथ करण्याकरता असते. तुम्ही जर ग्रेट आहात तर दुसऱ्या ना पण मदत करा आणि वर आणा अस असत. इथे मुल खूप अभ्यास करतात कारण त्यांना दुसऱ्या पेक्षा जास्त मार्क्स आणायचे असतात. पण इथले मुल खूप हुशार आणि मेहनती आणि जिद्दी असतात. म्हणून ते सगळ्या देशात नाव कमावतात.

स्वस्त दरात वस्तू घेऊ शकत असल्याने गरीब माणूस पण जगू शकतो. तिकडे सगळ महागड आहे.

इंडिया मधे Weather खूप छान आहे. पन प्रदुषण कमी करावं लागणार. इथे लोक खूप कचरा करतात. गवर्नमेंट कचरा साठी गाडी पाठवते तरी पण लोक कचरा करतात. सगळीकडे कचरा असतो. आणि तिथेच स्ट्रीट फूड क्या आणि, भाजी आणि फळांच्या बाजार असतो.

बाहेर देशातून आलेल्या लोकांना हे बघून घाण वाटते कारण तिकडे सगळे जन स्वच्छ्ता पाळतो. हॉटेल मधे सुद्धा खाल्या नंतर सगळे लोक आपला टेबल साफ करतात.इथे लोकं खूप प्रेमळ असतात. खूप सण साजरे होतात. एकमेकांना भेटतात. खूप मोठी फॅमिली असते. सगले भावंडं एकत्र भेटतात.

इंडिया मध्ये खूप प्रकार चे झाड आहेत. दुसऱ्या देशात नाही. हे जपायला हवे.इंडियन खूप नशीबवान आहेत हे बाहेर देशात गेल्यावर कळते कारण इथली हवा, पाणी झाडे, प्राणी आणि निसर्ग खूप मोठा वरदान आहे.याला जपा. मी पुन्हा पुन्हा इंडिया ला भेट देत राहील.

                  अर्णव बुरघाटे

                  इयत्ता सहावी(USA)

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page