वाहतूक अपघात व्यवस्थापन.
जनतेचे कल्याण हे फक्त आणि फक्त जनतेच्या हातात आहे. कारण सरकार द्वारा केवळ नियम बनविले जातात. परंतु त्यांचे पालन करणे हे जनतेचे कर्तव्य आहे .
वाहतूक अपघात नियंत्रण यासाठी वाहतूक मार्गावर वाहनाची गती जर निश्चित असली तर सगळेच वाहन समान गतीने चालतील.

वाहन चालवताना ती सरळ रांगेत चालवावी. कोणीही पुढे जाणे आणि ओवरक्रॉसिंग
करण्याचा प्रयत्न करू नये. यासाठी कडक कायदा असावा.

वाहन चालवताना दोन वाहनांमध्ये अंतर असायलाच हवे.

मार्गावर प्राण्यांची आवक असते. यासाठी उपाय करायलाच हवे. वाढत्या लोकसंख्येत आणि वाहतूकीबाबत गांभीर्य राखायलाच हवे.

कुणीही नशेत वाहने चालू नये.

वाहनाचे परीक्षण नियमित झाले पाहिजे.

कोळसा च्या गाड्या नेहमी झाकलेल्या असव्या. प्रदूषण नियंत्रण होईल.

शालेय विद्यार्थ्यांना नेणाऱ्या वाहनांना प्राधान्य द्यावे व त्या काळात इतर वाहने हळू गतीने चालतील याची सोय करावी.याकरता शाळा असलेल्या भागात गती ची निर्धारित निश्चित करावी.
डिजिटल, कॅमेरा, सीसीटीव्ही ची व्यवस्था असावी.
अशारीतीने काही उपाय केल्यास आपण ही इतर देशा सारखे सुरळीत वाहतूक व्यवस्थापन करू.
सौ. स्वाती यादव, चंद्रपूर.