Sunday, December 7, 2025
HomeElectionनिवडणुकीतील त्या स्वयंसेवकांना अजूनही नाही मिळाले मानधन!
spot_img

निवडणुकीतील त्या स्वयंसेवकांना अजूनही नाही मिळाले मानधन!

निवडणुकीतील त्या स्वयंसेवकांना अजूनही नाही मिळाले मानधन!

मानधनासाठी स्वयंसेवक विद्यार्थी मारत आहे तहसीलच्या खेटा !

श्रेयश वानखेडे:

निवडणुकित मतदारांना मतदान करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये व विद्यार्थ्यांना लोकशाहीचा उत्सव निवडणूक प्रक्रिया जवळून बघता यावी यासाठी शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे स्वयंसेवकाची जबाबदारी सोपवली होती व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली परंतु बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या बल्लारपूर तालुक्यातील अनेक स्वयंसेवकांना तब्बल निवडणूक होऊन एक महिन्याचा कालावधी लोटनही अजूनही त्यांना मानधन देण्यात आले नाही व याबाबत विद्यार्थ्यांनी तहसिलमध्ये जाऊन विचारणा केली असता त्यांना टाळाटाळीचे उत्तर मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे शासनाचे ढिसाळ नियोजन व विद्यार्थ्याबद्दल असलेली संवेदना लोप पावलेली आहे असे दिसून येत आहे.

    नुकतीच एक महिन्या पूर्वी २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुक होवून गेली या मध्ये शासनाने बल्लारपूर विधानसभा मतदार संघामधील ४० विद्यार्थ्यांची यादी त्यांच्ये बँक खाते तपशीलसह शाळेकडून मागवून घेवून त्यांना एक दिवसाचे स्वयंसेवकाचे प्रशिक्षण दिले व त्या प्रमाणे विद्यार्थ्यांनी निवडणूक केंद्रावर चोख सेवा बजावली. दीव्यांग मतदाराला मतदान केंद्राच्या आत सोडणे, त्यांचा केंद्रक्रमांक शोधून देणे, त्यांना पाणी देणे असे अनेक कामे केलीत. परंतु त्या दिवशी सायंकाळी त्यांना कोणत्याच प्रकारचे मानधन देण्यात आले नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्या बँक खात्यात मानधन रक्कम जमा कण्यात येण्याचे कळविण्यात आले. परंतु आज एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही या बाबत विद्यार्थी सबंधित तहसील मध्ये विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिल्या जात आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून शासन या बाबत किती गंभीर आहे. हे दिसून येत आहे. या बाबत बल्लारपूर तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी  ए आर के अमोल ( निवडणूक सहाय्यक अधिकारी, मुल) यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. परंतु ते फोन उचल्याने सौजन्य दाखवत नाही आहे. यामुळे आता निवडणूक आयोगकडून विद्यार्थ्यांना मानधन मिळणार की नाही हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

” मला माझ्या कनिष्ठ महाविद्यालयातून सदर निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्या प्रमाणे मी सेवा बजावली परंतु अजून पर्यंत मला मानधन मिळालेले नाही याबाबत बल्लारपूर तहसील मध्ये व पंचायत समितीमध्ये मी गेलो होतो. त्यांनी मला कोणते समाधानकारक उत्तर दिले नाही याबाबत ते टाळाटाळ करत आहे. “

दुष्णत आमने, विद्यार्थी

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page