Friday, December 12, 2025
HomeMaharashtraइतिहास व राज्यशास्त्र विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विविध उपक्रमातून " राष्ट्रीय...
spot_img

इतिहास व राज्यशास्त्र विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विविध उपक्रमातून ” राष्ट्रीय मतदार दिन ” साजरा

इतिहास व राज्यशास्त्र विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विविध उपक्रमातून ” राष्ट्रीय मतदार दिन ” साजरा 

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन या निमित्ताने महाविद्यालयातील इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त माध्यमातून विविध उपक्रमा द्वारे ” राष्ट्रीय मतदार दिन ” साजरा करण्यात आला.
या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये मतदान व निवडणूक प्रक्रियेत जाणीव जागृती व्हावी या अनुषंगाने निबंध स्पर्धा व गीत गायन चे आयोजन करण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला होता तसेच 25 जानेवारी रोजी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ” मतदान शपथ ” घेण्यात आली ज्यात आपलं कर्तव्य पार पाडताना निष्पक्ष रित्या आपलं मतदान करून लोकशाहीचा अधिकार बजावेल अशी प्रतिज्ञा घेतली. यावेळी डॉ. किशोर चौरे(इतिहास विभाग), यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व समजावून सांगितले, तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत विद्यार्थ्यांनी मतदान करायला अवश्य जावे तरच मतदानाचा टक्का वाढेल असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी डॉ. बादलशहा चव्हाण, प्रा. शुभांगी भेंडे, [प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, (राज्यशास्त्र विभाग)], प्रा. जयेश गजरे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page