विजेत्यांना आजपर्यंत च्या सर्वात मोठ्या ट्रॉफी चे आकर्षण.
श्रेयश वानखेडे:
दि.26 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत एस पी एल चे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष विनोदबोराडे, प्रभाकरजी सुरवसे, मारोती चव्हाण, मिलिंद सावंत, लोकुलवार अण्णा, वहिद अन्सारी, रमेश दौड, शेख कासिम, सचिन कोरडे, सुरेश काळे, व्यंकट चव्हाण, राजेंद्र पवार, प्रकाश पवार, वल्लभ राठी, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, पत्रकार शिवाजी शिंदे, लक्ष्मण बोराडे, लक्ष्मण बुरेवार, बबन गायकवाड, बालाजी सरकाळे, जनाआबा सोळंके, सुभाषचव्हाण,आप्पू सोळंके, मनोज दीक्षित, संतोष बेंडे, राजू रोडगे आदींची उपस्थिती होती.
पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे पहिला बॉल खेळून लीगला ग्रीन सिग्नल दिला, उद्घाटन प्रसंगी फ्रेंडली मॅच आयोजित केले होते. यामधे डॉक्टर असोसिएशन तसेच मेडिकल असोसिएशन व वकील संघ यांच्यात सामना खेळवण्यात आला. यावेळी डॉ. असोसिएशनचे डॉ.परेश बिनायके वकील संघाचे अध्यक्ष एड.बाळासाहेब रोडगे व मेडिकल असोसि एशनचे श्री संदीप टाक त्यांच्या टीमसह उपस्थित होते,मॅचेस नंतर त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले, नंतर लीग ला सुरुवात करण्यात आली.
या लीग चे प्रथम पारितोषिक रु. 51000 हजार व भव्य 5 फूट ट्रॉफी व द्वितीय पारितोषिक रु. 21000 व भव्य 4 फूट ट्रॉफी विजेत्यांना देण्यात येणार आहे. सेलूतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना मोठ व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या लीग चे आयोजन करण्यात येते असते असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष साईराज बोराडे यांनी दिले.