Thursday, April 23, 2026
Homeबल्लारपूरजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे प्रजासत्ताक दिवस साजरा
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे प्रजासत्ताक दिवस साजरा

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे प्रजासत्ताक दिवस साजरा

गणित संबोध परीक्षा, शासकीय चित्रकला परीक्षा व शालेय क्रीडा स्पर्धा 2025 चे बक्षीस वितरण

खरी कमाई, नृत्य व गायन,

राष्ट्रीय मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला

श्रेयश वानखेडे :
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. राजू वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता शाळेचे मुख्याध्यापक मान. बी. बी. भगत यांनी केली. प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, मान. चंदू रामटेके यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमत: राष्ट्रपिता महात्मा गांधी व  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणित संबोध परीक्षा 2025 (वर्ग पाचवा) कु. अवनी पेटकर- प्रथम, आर्यन रामटेके- द्वितीय तसेच (वर्ग आठवा) कु. सिया देवगडे-प्रथम, कु. राशी वेले-द्वितीय यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी तसेच शासकीय चित्रकला परीक्षा 2025 मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शालेय क्रीडा स्पर्धा 2025 दिनांक: 20 ते 25 जानेवारी पर्यंत घेण्यात आल्यात. त्यामध्ये लंगडी, संगीत खुर्ची, बुद्धिमापन चाचणी, लिंबू चमचा, दोरीवरच्या उड्या, मटकी फोड, रांगोळी, पाककला, निबंध, सामान्य ज्ञान, बेडूक उड्या आदींचा समावेश होता या सर्व स्पर्धांत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
दिनांक: 22/01/2025 ला खरी कमाई उपक्रम घेण्यात आला. त्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
वेगवेगळे स्टॉल लावून विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या खाद्यपदार्थांची  विक्री केली.
दिनांक: 25/01/2025 रोजी राष्ट्रीय मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
दिनांक: 26 जानेवारी 2025 रोजी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य व गायन मध्ये विद्यार्थ्यांनी आपले अविष्कार सादर केले. आर. के. वानखेडे, एम. डी. टोंगे आणि बी. बी. भगत यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचेे  प्रास्ताविक आर. बी. अलाम, संचालन एस. एन. लोधे मॅडम तसेच आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण सर यांनी केले.
कार्यक्रमात यु. के. रांगणकर, चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, वामन बोबडे, इंद्रभान अडबाले, प्रियंका रामटेके, सुकेशनी निमकर, आम्रपाली वेले, चंपाबाई डुलगच, विजय कोंगरे, वर्षाबाई ठाकरे, सुंदराबाई वैद्य आदी पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी नाश्ता वाटप करण्यात आला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page