श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे शनिवार दिनांक: 8 फेब्रुवारी 2025 ला आनापान सति ध्यान सत्र संपन्न झाले. या ध्यान सत्राचे नेतृत्व धम्ममित्र भास्कर भगत यांनी केले.भास्कर भगत यांनी आनापान सति ध्यानाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष ध्यान सराव करून घेतला.
याप्रसंगी वर्ग पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक: 9 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. त्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र धम्ममित्र भास्कर भगत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
मंचावर मुख्याध्यापक भगत सर, वानखेडे सर उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन आर. के. वानखेडे यांनी केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.