Tuesday, August 18, 2026
spot_img
HomePoliticalबल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी पदावर देवेंद्र आर्य यांची नियुक्ती

बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी पदावर देवेंद्र आर्य यांची नियुक्ती

बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी पदावर देवेंद्र आर्य यांची नियुक्ती

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला  यांच्या आदेशाने प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार चंद्रपूर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी माजी गटनेते देवेंद्र सत्यदेव आर्य यांना बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या अगोदर बल्लारपूर शहर अध्यक्ष अब्दुल करीम हे होते. देवेंद्र आर्य यांनी आपल्या या पदावर नियुकी केल्याने त्यांनी जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे,  माजी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा ताई धानोरकर, चंद्रपूर जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, रजनीताई हजारे आणि माजी नगराध्यक्ष घनश्याम  मुलचंदानी यांचे आभार मानले.
देवेंद्र आर्य यांच्या नियुक्ती वर माजी शहर अध्यक्ष अब्दुल करीम, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी नगराध्यक्ष छायाताई मडावी, तालुका महिला अध्यक्ष अफसाना सय्यद, शहर महिला अध्यक्ष मेघा भाले, चंद्रपूर जिल्हा परिवहन अध्यक्ष नरेश मुंदडा, बल्लारपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश आनंद, भास्कर माकोडे, डॉ सुनील कुलदीवार, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई,  चेतन गेडाम, जयकिरण बाजगोती, इस्माईल ढाकवाला, प्राणेश अमराज, चंदा बुंदेल, मीना बहुरिया, रवी मातंगी, कासिम भाई, शरद अलोने, सुरेश बोप्पणवार यांनी अभिनंदन केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page