Friday, July 3, 2026
HomeChandrapurचंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगल जीवने कर्मवीर पुरस्काराने सन्मानित
spot_img

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगल जीवने कर्मवीर पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगल जीवने कर्मवीर पुरस्काराने सन्मानित

श्रेयश वानखेडे: शहरातील ज्येष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथील सभागृहात पत्रकारिता,सामाजिक कार्य,प्रशासन आणि ग्रामीण सेवेत उल्लेखनीय कार्याबद्दल
कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग,दै.नवराष्ट्र चे वृत्त संपादक डाॅ.प्रा.गणेश खवसे,सिडीसीसी बॅंक चे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरवातीस लोकमान्य बाल गंगाधर टिळक,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पुलकित सिंग व डाॅ.गणेश खवसे यांच्या हस्ते सत्कार मुर्ती मंगल जीवने यांचा सपत्नीक शाल,मानचिन्ह देऊन कर्मवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी अतिथींनी व सत्कार मूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले,संचालक शाम हेडाऊ यांनी व आभार प्रदर्शन प्रविण बतकी यांनी केले.कार्यक्रमात जिल्ह्यातील पत्रकार मंडळी व प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page