वंचित बहुजन आघाडी तर्फे मतपत्रिकेसाठी पोस्ट कार्ड पाठवा अभियान प्रारंभ
श्रेयश वानखेडे:
वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, बल्लारपूर शहर द्वारे दिनांक 15 ऑगस्ट 2025 ला वंचित बहुजन आघाडी कार्यालय व्यंकटेश अपार्टमेंट बस स्टँड जवळ कार्यालय प्रारंभ कार्यक्रम तसेच मतपत्रिकेसाठी पोस्ट कार्ड पाठवा अभियान प्रारंभ करण्यात आले. बल्लारपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका ह्या मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्या, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी सुद्धा मान. तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन प्रेषित केले होते. तरीदेखील या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काहीही हालचाल होत नसल्याचे आढळून आल्याने वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरने पुन्हा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने मान. जिल्हाधिकारी यांना (पोस्ट कार्ड) पत्र पाठवा अभियानाची सुरुवात केली व बल्लारपूरच्या जनतेला आव्हान करण्यात आले की, येत्या आठवड्याभरात जास्तीत जास्त पत्र मतपत्रिकेची मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात यावे. याचा प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2025 ला दुपारी 12.00 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व युवा आघाडी आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष उमेश कडू यांनी बल्लारपूरच्या जनतेला आव्हान केले आहे की, जास्तीत जास्त नागरिकांनी हे पोस्ट कार्ड कार्यालयातून नेऊन आपले नाव वार्डाचे नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक लिहून मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर या पत्त्यावर पोस्ट करावेत जेणेकरून प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेत येणारी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक मतपत्रिकेद्वारे हे घेण्यात येईल असे आशा व्यक्त केली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्ह्याचे संघटक अजयभाऊ गावंडे, महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई पागडे, प्रज्ञाताई नमनकर, किरणताई रामटेके, समताताई लाभाने, आशाताई भाले, सविताताई तुलकर, सारिका साखरे, सिटी लोंढे, अलका अलोणे, रंजीता ढोरे, गौतम रामटेके शहर महासचिव, राकेश पेटकर संघटक, प्रभुदास देवगडे, कोषाध्यक्ष, प्रियंकेश शिंगाडे, ईश्वर पाटील, उराडे साहेब, मनोज रघुवंशी, सुरज शृंगारे, प्रशांत कलवला आदी कारीकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.