Tuesday, December 9, 2025
HomeChandrapurक्लोरीन गॅस गळतीवर तातडीने प्रशासनाकडून नियंत्रण...
spot_img

क्लोरीन गॅस गळतीवर तातडीने प्रशासनाकडून नियंत्रण…

क्लोरीन गॅस गळतीवर तातडीने प्रशासनाकडून नियंत्रण… 

Jyotsna Wankhede: दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रहमत नगर परिसरातील चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन (CTPS) च्या सिव्हेज ट्रीटमेंट प्लान्ट (STP PLANT) येथे झालेल्या क्लोरीन गॅस गळतीची घटना घडली असून मनपा प्रशासनाकडून तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत संबंधित विभागांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे.
नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने गळतीमुळे होणार संभव्य धोका पाहता परिसरातील १२५ नागरिकांना मनपाच्या यंत्रणेद्वारे महात्मा ज्योतिबा फुले शाळा, किदवाई हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले. मनपाच्या प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांनी घटना स्थळी येऊन पाहणी केली व प्रशासनास आवश्यक त्या सूचना दिल्या त्यानुसार मनपाचे अति. आयुक्त श्री. चंदन पाटील, उपायुक्त श्री. संदीप चिद्रावार यांनी प्रभावित नागरिकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या व त्यानुसार सर्व नागरिक सुरक्षित रित्या स्थलांतरित करण्यात आले. तसेच, वैद्यकीय पथके व आपत्कालीन सेवा मनपाद्वारे घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या व त्यानुसार परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सर्व नागरिकांना घाबरून न जाण्याच्या विश्वास मनपाद्वारे देण्यात येत आहे.
घटनास्थळी नियंत्रण ठेवण्यास श्री. सुदर्शन मुमक्का साहेब, पोलीस निरीक्षक, श्री. सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस  अधिकारी, श्री. ईश्वर कातकळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. असिफ शेख, पोलीस  निरीक्षक रामनगर, श्री. निशिकांत रामटेके, पोलीस  निरीक्षक चंद्रपूर शहर, श्री. अमोल काचोरे, पोलीस  निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व दंगा नियंत्रण पथक, इतर पोलीस अधिकारी व अमंलदार इत्यादी अधिकारी उपस्थित होते
स्थलांतरित १२५ नागरिकांना मनपाद्वारे सर्व सेवा उपलब्ध
स्थलांतरित करण्यात आलेल्या १२५ नागरिकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शाळा व किदवाई हायस्कूल येथे राहण्याची, पाणी, जेवणाची व निवासाची संपूर्ण व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली आहे आणि मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page