जननायक, विकासपुरुष मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार (माजी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. चंदनसिंह चंदेल (माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. श्री. रणंजय सिंह (शहराध्यक्ष, भाजपा बल्लारपूर) व श्री. सतीश कनकम (महामंत्री, भाजपा बल्लारपूर) यांच्या उपस्थितीत दि. 17/09/2025 रोजी होणाऱ्या बथुकम्मा उत्सव आयोजनाबाबतची बैठक संपन्न झाली.
बैठकीत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला की हा उत्सव भव्य दिमाखात पार पडणार असून, या कार्यक्रमात संपूर्ण बल्लारपूर शहरातून सुमारे 2000 महिला सहभागी होणार आहेत.
हा भव्य उत्सव दि. 30/09/2025 रोजी शगुन लॉनसमोरचे मैदान, बल्लारपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाला यशस्वी करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती :
•माजी नगरसेवक श्री.येल्लाय्या दासराफ
•श्री. स्वामी रायबरम, श्री. शंकर तोकल, श्री. धर्मराज तगरम, श्री. रवि अडपु, श्री. श्रीनिवास कंदुकुरी, श्री. हरिबाबू लंका, श्री. रोहन तोकल, श्री. वेंकटेश येलगमवार, श्री. श्रीनिवास उष्कलवार, श्री. अक्षय बोम्मावार, श्री. कृष्णा नागिल्ला, श्री. सतीश बोंकुरी
•माजी नगरसेवक श्री. महेंद्र ढोके, श्री. अरुण वाघमारे, श्री. मिथलेश खेंगर, श्री. अज़हर शेख
तसेच इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.