धम्म प्रचारसाठी प्रचारकांची गरज आहे!
Jyotsna Wankhede:
धम्म ज्ञान प्राप्त होण्यापासून खूब लोक वंचित आहेत त्यांचे पर्यंत धम्म नेणारे प्रचारक आवश्यक आहे.बुध्द विहारातून हे प्रचारक निर्माण झाले पाहिजे असे प्रतिपादन त्रिरत्न बौध्द महासंघ धम्म मित्र भास्कर भगत यांनी केले.ते बुध्द विहार समन्वय समितीचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा समारोप प्रसंगी बोलत होते.
शनिवार दिनांक १९ सप्टेंबर,२०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील भिक्षू निवास पालि विद्यालय बुध्द विहार विद्यानगर येथे आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौध्द यांनी दिवसभर मार्गदर्शन केले.
बुध्द विहार समन्वय अभियान गतिमान करण्यासाठी सहभागी व्यक्तीला आपण ज्या संघटनेत कार्य करीत आहेत ती संघटना सोडायची गरज नाही.ते कार्य करता करता बुध्द विहारांचा समन्वय करण्यासाठी प्रयत्न करावे.
साप्ताहिक व्याख्यान माला,पालि भाषा परीक्षा केंद्र चालविणे,लेणी संवर्धन धम्म यात्रा आयोजन करणे,बुध्द विहार अधिवेशन घेणे इत्यादी उपक्रम कसे राबविले पाहिजे या विषयी मुख्य मार्गदर्शन केले.समाजातील
अनेक समस्या या अभियान यशस्वी केल्याने निस्ताराल्या जातील हे त्यांनी सविस्तर समजून सांगितले.
समारोप कार्यक्रमात बुध्द विहार अध्यक्ष तुळशीदास खैरे,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, पालि भाषा प्रशिक्षक आचार्य अशोक टेंभरे, माजी न. प.उपाध्यक्ष संपत कोरडे यांनी मार्गदर्शन केले.
संचालन जयदास भगत यांनी केले.शिबीराचे आयोजन बुध्द विहार समितीने केले.तालुक्यात
पालि भाषा परीक्षा केंद्र सुरू करण्याची जबाबदारी जयदास भगत यांनी घेतली.शिबिराला विविध बुध्द विहारांचे ३५ प्रतिनिधी उपस्थित होते.