डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविला.

Jyotsna Wankhede:
इंडियन रेड क्रॉस सोसायटी, दिव्यांग कौशल्य विकास संस्था, एकात्मिक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या सहकार्याने डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
हा कार्यक्रम स्व. दादाजी बेले मतिमंद निवासी विद्यालय, सरस्वती विद्यालयच्या मागे, भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये विशेषत: दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच त्यांना आयुष्मान भारत कार्ड तयार करून देण्याची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. मधुकर पुंडलिक गुलवाडे सर यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सेवक मनोज धोटे, अशासकीय सदस्य जिल्हास्तरीय दिव्यांग समितीचे निलेश पाझारे, शाळेचे मुख्याध्यापक अमोल पानघाटे, शाळेचे अधीक्षक शफि मोहम्मद कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते आशिष चोपडे, रुपेश ताकसांडे, सोनल रामटेके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख संचालन पुष्पा सावसाकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल पानघाटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशिष गिरडकर, सुभाष मुरस्कर, आरिफ काजी, तसेच स्व. दादाजी बेले मतिमंद निवासी विद्यालयाचे कर्मचारी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि दिव्यांग कौशल्य विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आरोग्य सुविधा या दोन्हींचा लाभ एकाच ठिकाणी मिळाला असून, समाजातील वंचित घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरला आहे.









