धनोजे कुणबी समाज मेळावा व गुणवंतांचा सत्कार संपन्न
Jyotsna Wankhede:
नगर धनोजे कुणबी समाज द्वारा संचालित श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर बामनी तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही दि.8.ऑक्टोबर 2025 ला धनोजे कुणबी समाज चा मेळावा व मान्यवर व विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम, संत तुकाराम महाराज सभागृहात घेण्यात आला. महिला व मुलामुलींच्या नृत्य व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमनी सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पांडुरंग जरीले, अध्यक्ष संत तुकाराम महाराज सेवा मंडळ, प्रमुख पाहुणे म्हणुन खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, मा.श्रीधर राव मालेकर अध्यक्ष धनोजे कुणबी समाज मंडळ चंद्रपूर, मा.ओंकार ठाकरे नायब तहसीलदार चंद्रपूर, कमलताई वडस्कर सह सचिव संत तुकाराम महाराज सेवा मंडळ यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम चे प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र खाडे सचिव संत तुकाराम महाराज सेवा मंडळ यांनी केले. त्यात मंडळ च्या विविध उपक्रमांची यांनी माहिती दिली. या प्रसंगी विशेष शिक्षण व सामाजिक कार्यासाठी काही मान्यवर चा सत्कार करण्यात आला. त्यात डॉ. अनिल वाढई यांचा सत्कार C.D.C.C.बँक चंद्रपूर मध्ये संचालक पदावर निवड झाल्याबद्दल, विशेष सामाजिक कार्यासाठी डॉ. सदानंद पाटील चंद्रपूर, व डॉ. अशोकराव घुंगरूडकर आजीवन सदस्य, यांचा सत्कार करण्यात आला. मा.श्रीमती सुधा वासाडे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका, डॉ. प्रशांत ढवस व डॉ. श्रीमती मृणाली ढवस यांचा आचार्य पदवी बहाल झाल्याबद्दल, अॅड. सचिन डेरकर सहायक सरकारी अभियोक्ता नियुक्ती साठी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळ चे विशेष कार्यामध्ये आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मदत केली जाते या मदत निधी मध्ये रुपये 50 हजार (पन्नास हजार रुपये)मदत प्राध्यापक आनंद राव वडस्कर यांच्या जन्म दिनी स्मृतिप्रीत्यर्थ श्रीमती कमलताई वडस्कर यांनी केल्या बद्दल त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंत चे सत्कार कार्यक्रम त वर्ग 10 वि चे 21,वर्ग 12 वि चे 3,व पदवी प्राप्त 13 विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. सुवर्णा कष्टी व अचल काकडे यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रम ला बहुसंख्येने समाज बांधव सहकुटुंब उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक मंडळ सदस्य प्रा.एम. यू. बोंडे, विनायक साळवे, मनोहर माडेकर, गजानन घुगुल, एस. पि.धांडे, प्रा.युवराज बोबडे, किसन पोडे, भास्कर वडस्कर, तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना पोटे, सोनाली काकडे, किरण बोबडे, सुवर्णा कष्टी, युवा आघाडी चे विवेक खुठेमाटे, अतुल बांदुरकर, बालाजी भोंगळे, यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम चे संचालन अतुल बांदुरकर, बालाजी भोंगळे, व आभार प्रदर्शन नितीन वरारकर यांनी केले.