संघ आणि संघविरोधी पक्ष/संघटना यांच्यातला फरक अगदी व्यवस्थित उलगडणारी Chaitanya Deshpande याची उत्तम पोस्ट…
विजयादशमीच्या आधी आणि नंतर एकूणच सगळीकडे संघाच्या शतकपूर्तीच्या वातावरणाचा माहोल जमून आलाय. एकंदरच मजा येतेय. संघाची प्रार्थना, संघाचा इतिहास, सगळे सरसंघचालक, त्यांची पार्श्वभूमी अगदी सगळीकडे ठळक दाखवण्यात येत आहे. सरसंघचालकांनी दिल्ली मध्ये घेतलेल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेने पण बराच माहोल तयार झाला.
संघाने स्वतःला किंवा संघाला इतरांनी न्यूजमीडिया, सोशल मीडिया वर याआधी खूप व्हायरल कधीच नव्हतं केलं. संघ स्वतःला ग्राउंड वर व्हायरल करतो. तेच जास्त महत्वाचं आहे. यावेळी youtube असो, फेसबुक असो, इंस्टा असो किंवा x… सगळीकडे संघाचा वणवा पेटला होता. हे बघून एकूणच विरोधी गटात खळबळ उडाली. उडायलाच हवी. हे सगळे विरोधी पक्ष, संघटना वरवरचं राजकारण करणारे. ठोस असं ग्राउंड वर्क कोणाकडेच नाही. आपले घर सोडून बाहेर कधी यांनी बाहेर बघितलेच नव्हतं. या शंभर वर्षात संघ आपल्या स्पीड ने पसरत गेला. शाखेच्या ग्राउंड वरून घराघरात पोहचला.या लोकांना हे सगळंच अकल्पनीय होतं. छत्रपती संभाजीनगर च्या जॉईन rss च्या स्टॉल वर जाऊन तमाशे करणं असो, वेगवेगळ्या संचलनासमोर जाऊन केलेले फुटकळ विरोध किंवा पैसे, पेट्रोल देऊन कार्यकर्ते जमवून काढलेले मोर्चे एवढंच हे लोक करू शकतात. कारण त्यांच्याजवळ केवळ हीच पद्धत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह राहण्यासाठी दिलेले हेच फक्त उपक्रम त्यांच्याकडे आहेत.
या लोकांनी संघाची मंडल, तालुका, जिल्हा, प्रांत, क्षेत्र पर्यंतची खालून वर जाणारी कार्यकारणीची hierarchy (फक्त कागदावरची नाही, काम करणारी) बघितली तर हातभर (कापड) फाटेल. कारण एवढं constructive आणि detailed काम यांनी कधीच बघितलेलं नसतं. वर्षाला होणारी योजना बैठक जर यांनी दिवसभर बसून अनुभवली तर यांच्या डोक्याला मुंग्या येतील. कारण वर्षभराचं बारीक बारीक प्लॅनिंग आधीच करून ठेवायचं तेपण अखिल भारतीय ते सर्वात खालची इकाई म्हणजे वस्ती इतक्या Macro आणि Micro दोन्ही लेव्हल पर्यंतच हे यांच्या विचार करण्याच्या पलीकडे असतं. जेव्हा परगावाच्या बैठकीला (सततच्या बैठकी 
) पण स्वतःचे पैसे खर्च करून जायचं असतं हे याना कळलं तर त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी येईल कारण बोलेरो, बससाठी पैसे पाठवल्याशिवाय गावातून यांचा कार्यकर्ता बाहेर पडतच नाही.
याउपर जेव्हा यांना कळतं की हे सगळे काम करणारे लोक कुठल्याही आर्थिक मिळकतीशिवाय स्वतःचे पैसे खर्चून, स्वतःचे पेट्रोल जाळून काम करत आहेत, वेळेप्रसंगी ग्रामीण भागातला प्रचारक, कार्यकर्ता सायकलवर, एसटी बसने, किंवा पायीच संपर्क करतो. भारतात सर्वदूर अश्या पद्धतीने काम होतं आहे हा कन्सेप्टच यांच्या समजुतीच्या दोन किलोमीटर वरुन निघून जातो कारण भाऊंच्या वाढदिवसाला भाऊंच्याच पैश्यांनी फ्लेक्स (त्यात स्वतःचे पण पासपोर्ट साईझ लावलेले) लावून, भाऊंच्याच पैश्यांचा केक आणणारे कार्यकर्तेच केवळ भाऊंना मिळालेले असतात.
संघ हा शंभर वर्षांपासून एखाद्या मोठ्या वटवृक्षाप्रमाणे खालच्या जमिनीत खोलवर मुळं फैलावत चाललाय. तुम्ही अजून केवळ वरचे झाड बघितले आहेत खालचा मुळांचा फैलाव त्यांच्या आवाक्यात देखील नाही.
संघाची स्थापना नागपूरात झाली असली तरीही आजचे सर्वोत्कृष्ट शारीरिक, सांघिक हे केरळच्या स्वयंसेवकांचे असते. नागपूरला होणाऱ्या संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग दोन ( पूर्वीचे तृतीय वर्ष) मध्ये देशभरातले स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी येत असतात. तिथे येणाऱ्या केरळी स्वयंसेवकांचे उत्कृष्ट असे नियुद्ध (कराटे), दंडयुद्ध, समता बघून आपले नखांसहित बोट घशात जातात. केरळ मध्ये हे होऊ शकलं याचे मुख्य कारण आहे प्रतिकुलता. तिथं साधी शाखा लावायची म्हंटल तरी कुठून डाव्या तलवारी, डावे दगडं घेऊन डावा जमाव धावून येईल सांगता येत नाही. प्रतिकुलतेमध्ये संघ दुपटीने वाढतो, अधिक कर्मठ होतो. बाकी अश्याच प्रतिकुलतेची बाकी ठिकाणी कल्पना करा. शाखा घ्यायला परवानगी लागते, शाखा लावणं कठीण आहे म्हंटल्यावर संपर्काला दहा वेळा घरी जाऊन येरे बाबा शाखेत म्हंटल तरी न येणारा स्वयंसेवक देखील सर्वात आधी ग्राउंड वर पोहचेल.
संघ म्हणजे काही बीजेपी नाही, काँग्रेस तर मुळीच नाही. कुठली ब्रिगेड, बाकी कुठल्या कुठल्या दलांच्या हजारो वर्ष पुढे असलेली, पॉलिटिकल पक्षांच्या पलीकडे असलेली एक अभुतपूर्व सामाजिक संघटना आहे. ज्याचे फंडामेंटल्स, काम करण्याची पद्धत तुम्ही कधी समजूनच घेतली नाही. त्यामुळे तुम्हाला ठाऊक देखील नाही. ते समजून घेतलं तरी संघापर्यंत पोहचायला तुम्हाला शेकडो वर्षे लागतील. तोवर संघ समाजात आणखीन एकरूप झालेला असेल. कदाचित तेव्हा तुमची गरज ही लागणार नाही कारण तोवर संघाने “तुमचं-आमचं” ही वैचारिक-सामाजिक दरी मिटवून, संपूर्ण समाजाला एकत्रित करून एकात्मता प्रस्थापित केलेली देखील असेल. त्यावेळी आज संघाला विरोध करणाऱ्या विचारधारा, त्यांचे नेते, कार्यकर्ते रोज संध्याकाळच्या शाखेत एक लॉंग तीन शॉर्ट वाल्या शिट्टीला अग्रेसर म्हणून उभे राहतील.
– चैतन्य देशपांडे
|
|









