Tuesday, December 9, 2025
HomeSpardhaघुग्गुस येथील आर्थिका व आर्येश चे कराटे स्पर्धेत सुयश
spot_img

घुग्गुस येथील आर्थिका व आर्येश चे कराटे स्पर्धेत सुयश

घुग्गुस येथील आर्थिका  व आर्येश चे कराटे स्पर्धेत सुयश

Jyotsna Wankhede:
नागपूर येथे २५ व २६ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या ओपन ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत घुग्गुस येथील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता सेन्सई श्री. विनय बोढे संचालित ” फिट टू फाईट ” अकॅडमीची कु. आर्थिका संजय उपाध्ये आणि तिचा भाऊ आर्येश संजय उपाध्ये या दोघांनीही आपल्या दमदार खेळाच्या जोरावर सुवर्ण पदक पटकावून घुग्गुस शहराचा मान उंचावला आहे.
या स्पर्धेत विदर्भातील एकूण ३१७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तीव्र स्पर्धेमध्ये आर्थिका आणि आर्येश यांनी उत्कृष्ट लढत देत आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. त्यांच्या शिस्त, परिश्रम आणि आत्मविश्वासामुळे त्यांनी सुवर्ण पदक मिळवले.
या यशाबद्दल स्थानिक नागरिक, शिक्षकवर्ग आणि क्रीडाप्रेमी यांनी उपाध्ये बहीण-भावंडांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 “आर्थिका आणि आर्येश यांचे यश हे घुग्गुस तसेच नवीन कराटे खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे,” असे अनेकांनी गौरवोद्गार काढले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page