श्री साईबाबा संस्थान द्वारा कपडे व दिवाळी चा फराळाचे वाटप
Jyotsna Wankhede:
दरवर्षी प्रमाणे या वर्षी दि.5 नोव्हेंबर 2025 ला श्री साईबाबा संस्थान बालाजी वॉर्ड बल्लारपूर तर्फे अति दुर्गम भागात पहाडावर असे गाव आहे. गावातून पाहिले तर वर खूप मोठा पहाड व खाली पाहिले तर खुप मोठी खाडी असे वसलेले गाव पाटागुडा व
जनकपूर येथे कपडे ब्लँकेट, साडी व ईतर कपडे तसेच दिवाळी चे फराळ (पाकीट)वाटप करण्यात आले. जवळपास 150 कोलम लोकांनी याचा लाभ घेतला. प्रथम साईबाबा च्या प्रतिमेला माल्यार्पण करून वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत पाटण अंतर्गत पाटागुडा व जनकपुर येथील जंगल व पहाडी भागात आहे. खरोखरच तेथील लोकांना कपडे, अन्न व निवाराची आवश्यकता आहे. त्यांचे एकही घर विटा माती चे नाही,हे विशेष. त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. यशस्वीते साठी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग जरीले, शांता जरीले, तुळशीराम महाकालकर,शंकर पुलगमवार, महेंद्र महाजन, वैष्णवी महाजन यांनी अथक परिश्रम घेतले.