Saturday, December 6, 2025
HomeChandrapurचंद्रपूर तालुक्यात एकुण 1265 शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित
spot_img

चंद्रपूर तालुक्यात एकुण 1265 शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित

चंद्रपूर तालुक्यात एकुण 1265 शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित 

Jyotsna Wankhede: अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वात निवासी जिल्हाधिकारी कुंभार यांचे कडे निवेदन सादर केले आहे. चंद्रपुर तालुक्यातील १२६५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अतीवृष्टीची मदत निधी प्रलंबित आहे.  त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपुर तालुक्यातील नुकसान झालेल्या १२६५ शेतकऱ्यांना अजुन पर्यंत शेतकऱ्याला अतीवृष्टी ची रक्कम खात्यात आली नाही आहे.  महसुल व वन विभागा अतंर्गत दि. १० ऑक्टोंबर २०२५ च्या महाराष्ट्र शासन निर्णयात ज्या शेतकऱ्याची अग्रीस्टॅक मध्ये नोदणीं नाही, अशाना सुद्धा नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे, असे शासन निणर्यात नमुद आहे. मात्र त्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यांना त्वरीत अतिवृष्टीची रक्कम देण्यात यावी ही मागणी  गणेश आवारी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, गिरीश मुसळे,देविदास येरगुडे,योगेश्वर पिपंळकर, बंडू बेरड, विनोद पिंपळकर, नामदेव पिंपळकर, रंगराव पवार, रामकिसन पाचभाई, देविदास येरगुडे, गणेश येरगुडे, आशिष मुसळे,  विठ्ठल पिंपळकर, रामराव देवतळे यांचेसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page