Sunday, December 7, 2025
HomeElectionवंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहराची पत्रकार परिषद संपन्न
spot_img

वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहराची पत्रकार परिषद संपन्न

वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहराची पत्रकार परिषद संपन्न

Jyotsna Wankhede: दिनांक 19 नोव्हेंबर 2025 ला वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहरची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. बल्लारपूर नगर परिषदे करिता नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत असलेल्या ज्योत्सना दीपक वाळके वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.
या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकतीने निवडणूक लढवीत आहे सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकपदाकरीता 11 उमेदवार निवडणूक लढवीत आहे. सोबतच मान. जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार बल्लारपूर शहरातील इतर अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन पूर्ण ताकतीने निवडणुकीचा विजय घोषित करण्याचा मनसुबा वंचित बहुजन आघाडीने आखला आहे. या पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे मान. जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ तावडे यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्योत्सनाताई वाळके यांचा परिचय व त्यांच्या कामाचा आढावा उपस्थित पत्रकारवृंदांना दिला व हा उमेदवार शहरांमध्ये प्रतिस्पर्धी सर्व उमेदवारांवर सरस ठरवून विजयी होईल. असा आत्मविश्वास व्यक्त केला.
 याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकर, बल्लारपूर शहर निरीक्षक रूपचंदजी निमगडे, महिला जिल्हा आघाडीच्या ज्येष्ठ सल्लागार सत्यभामाताई भाले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा नम्रताताई साव,  शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू, महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष रमण पुणेकर, भारतीय बौद्ध महासभा  शहराध्यक्ष गायत्री रामटेके, शहर संघटक राकेश पेटकर, शहर महासचिव गौतमभाऊ रामटेके, तालुका युवा आघाडी अध्यक्ष अभिलाष चुनारकर, देवरामजी नंदेश्वर, दुरेश तेलंग व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page