देवगिरी नागरी सहकारी बँकेतर्फे सहकार सप्ताह दिन साजरा.
सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांचा यथोचित सत्कार.
Jyotsna Wankhede: दि.20 देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वत्तीने सहकार सप्ताहानिमित्त येथील सर्व सहकारी पतसंस्थेतील सहकारी अधिकार्यांसह कर्मचार्यांना तसेच सहकार क्षेत्रातील कार्याची माहिती विशद करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून यशवंत सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विवेक सोन्नेकर साहेब,प्रमुख पाहुणे जनकल्याण सहकारी पतसंस्थेतील धर्माधिकारी साहेब, डॉ शिवाजी शिंदे हे उपस्थित होते.धर्माधिकारी साहेबांनी सहकार क्षेत्रातील कार्याची माहिती सहकार क्षेत्रातील विविध संस्थांतर्गत समन्वयासह अडीअडचणींविषयी विचारमंथन, सरकारी पातळीवरील धोरणात्मक निर्णयाकरीता पाठपुरावा वगैरेंबाबत तपशीलवार माहिती सर्व उपस्थितीत विविध पतसंस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सांगितली.डॉ. शिवाजी शिंदे यांनी आपल्या भाषणात देवगिरी नागरी सहकारी बँक (शेड्युल्ड बँक) ही व्यावसाया सोबतच विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत नेहमीच ग्राहकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून सहकार्य करत असल्याचे मत व्यक्त केले.या प्रसंगी विविध पतसंस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रास्ताविक देवगिरी नागरी सहकारी बँकेचे शाखाधिकारी विश्वास देव यांनी व्यक्त केले तर आभार बँकेचे अधिकारी अमोल बोरीकर यांनी मानले.