Jyotsna Wankhede:सेलू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय तापमान दिवसेंदिवस तापत आहे. नगराध्यक्ष पदासाठी यंदाची लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. भाजप – शिवसेना शिंदे गटाची युती फिसकटल्याने तिन्ही प्रमुख पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अॅड. विष्णू ढोले यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून नवीन आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे सेलूतील राजकीय चित्र आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.नगराध्यक्ष सेलू पदा
साठी भाजपकडून मिलिंद सावंत यांचे नाव निश्चित असल्याच्या चर्चा रंगल्या होत्याः मात्र स्थानिक स्तरावरून अचानक विरोध पुढे आला. युती तुटल्याने भाजपचे गणित ढासळले. काही गटांनी स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. वरिष्ठ पातळीवर बैठकांचा सपाटा सुरू असून अंतर्गत नाराजी शांत करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. काँग्रेस कडून आत्माराम साळवे हे बलाढ्य उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. मध्यमवर्गीय आणि महिला मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मतभेदामुळे काँग्रेसला अप्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यता असून या तिरंगी लढतीत काँग्रेसला ‘डार्क हॉर्स’ म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान महायुतीत बिघाडी झाल्याने सर्व राजकीय गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अॅड. विष्णू ढोले यांची भाजप-शिंदेसेना नगराध्यक्ष पदाची उमेदवारीवर घोषित करण्यात आली आहे. त्यांच्या एन्ट्रीने निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. सेलूचे स्थानिक प्रश्न आणि मतदारांचे गणित मतदारांचे लक्ष शहरातील प्रत्यक्ष समस्यांवर केंद्रीत झाले आहे. अपुरा पाणीपुरवठा, अरुंद व खराब रस्ते, ड्रेनेजचा निकृष्ट कारभार, बाजारपेठेतील अनियंत्रित गर्दी, स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी मतदार स्पष्टपणे सांगत आहेत. एकंदरच सेलू नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुरुवातीला तिरंगी वाटत होती. मात्र आता चौरंगी लढतीची शक्यता वाढत असून, कोणता पक्ष वरचढ ठरेल हे भाकीत करणे कठीण झाले आहे. सेलू शहराची हीनिवडणूक राजकीय घडामोडीनी भरलेली आणि रोमांचकारी ठरणार हे निश्चित.