Tuesday, December 9, 2025
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे संविधान दिवस साजरा
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे संविधान दिवस साजरा

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे संविधान दिवस साजरा

रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन 

Jyotsna Wankhede:
दिनांक: 26 नोव्हेंबर 2025 ला जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, रवी हिकरे पालक यांची मंचावर उपस्थिती होती. प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
रांगोळी स्पर्धेत:-
प्राथमिक  गटात:
काव्या बोरीकर- प्रथम, अनुष्का दुर्गे- द्वितीय, रुषाली महानंद- तृतीय
माध्यमिक गटात:
त्रिशाली महानंद-प्रथम, वैशाली महानंद- द्वितीय
चित्रकला स्पर्धेत:-
प्राथमिक गटात:
आराध्या वेले- प्रथम, कृतिका वर्मा- द्वितीय, उबेद खान-तृतीय
माध्यमिक गटात:
बेनि वर्मा- प्रथम, राशी वेले-द्वितीय, यश माणूसमारे- तृतीय आदींना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी सांगितले की, संविधानातील तरतुदीनुसार आपल्याला आपले अधिकार प्राप्त झालेले आहे. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे.
एस. एम. चव्हाण सर यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावर आधारित घटना तयार केलेली आहे. अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना महत्त्व कळले पाहिजे, यासाठी संविधान दिवस साजरा करणे आवश्यक आहे.
प्रास्ताविक आर. के. वानखेडे संचालन एस. एम. चव्हाण व आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमात वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान
अडबाले आदि शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी वृंद उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page