Sunday, December 7, 2025
HomeChandrapurमृत झालेल्या कुटुंबियाच्या पात्र वारसदाराला शासकीय नोकरी
spot_img

मृत झालेल्या कुटुंबियाच्या पात्र वारसदाराला शासकीय नोकरी

मृत झालेल्या कुटुंबियाच्या पात्र वारसदाराला शासकीय नोकरी

Ø ॲक्ट्रोसिटी कायद्यांतर्गत शासन निर्णय जारी, 1 डिसेंबर रोजी कार्यशाळा

चंद्रपूर( जीमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 20 नोव्हेंबर 2025 अन्वये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट-क व गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्यास शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे
त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत खुन प्रकरणामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना गट-क य गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय पदावर शैक्षणिक अहतेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात 1 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर  या कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील वारसांनी नियोजित कार्यशाळेला उपस्थित राहून, अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, विनोद मोहतुरे यांनी केले  आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page