Saturday, December 6, 2025
HomeParbhaniसेलू शहरातून बाहेरगावी असलेल्या मतदारांवर उमेदवारांचे लक्ष केंद्रित.
spot_img

सेलू शहरातून बाहेरगावी असलेल्या मतदारांवर उमेदवारांचे लक्ष केंद्रित.

सेलू शहरातून बाहेरगावी असलेल्या मतदारांवर  उमेदवारांचे लक्ष केंद्रित.

Jyotsna Wankhede : सेलू नगर परिषदेच्या क्षेत्रात निवडणुकीचा चांगला ज्वर चढत आहे. निवडणूक घेऊन रिंगणात असलेले उमेदवार विविध बाबीवर लक्ष ठेवून आहेत. यापैकी प्रमुख बाब म्हणजे कामासाठी बाहेर गेलेले मजूर आणि नोकरदार भरपूर प्रमाणात आहेत. निवडणुकीच्या तारखेपर्यंत गावात येतील का? किंवा त्यांना आणता येईल का? आणि आल्यानंतर ते आपल्यालाच मतदान करतील का? अश्या सर्व प्रश्नांवर उमेदवारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. या सेलू शहरातील मजूर रोजगारासाठी दरवर्षी विविध शहरामध्ये जात असतात. सेलू नगर परिषदेच्या क्षेत्रातील मजूर, तसेच बेरोजगार युवकांना ही शिक्षणासाठी, कामासाठी, स्थलांतर केले असल्याचे चित्र स्पष्ट आहे.सेलू नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी आहे. बहुतेक प्रभागातील मतदारांनी कामानिमित्त गावातून स्थलांतर केली आहे. काही मतदार बाहेर जिल्ह्यात,राज्यात गेले असून निवडणुकीच्या तारखेपर्यंत ते परत येण्याची शक्यता नाही त्यामुळे अशा मतदारांसाठी काय उपाय योजना कराव्या लागतील याची चिंता उमेदवारांना लागून आहे. उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेरगावी गेलेले विद्यार्थी वंचित राहणार कारण मतदानाच्या दिवशी सर्वत्र सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे बाहेरगावी उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेलेले विद्यार्थी, कर्मचारी मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे अश्या सर्व मतदारांची शोधाशोध सुरु झाली आहे असे दिसून येत आहे.सेलू नगरपरिषदेच्या निवडणुकीत एका एका मतदानाला महत्व आहे.दुसरीकडे प्रत्येक प्रभागांमधून पाच ते सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारामध्ये मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे बाहेर गेलेले नोकरदार, तरुण विद्यार्थी मतदार निकालावर निश्चितच प्रभाव टाकू शकतात.याची जाणीव उमेदवारां ना आहे. मतदानाच्या दिवशी पर्यंत या मतदारांना गावी कसे आणतात येतील, याचे आराखडे उमेदवार तयार करीत आहे. नोकरदार वर्ग तरुण मतदार कोणत्या शहरात आहे?त्यांना गावात आणण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे?याची आर्थिक बेरीज प्रत्येक उमेदवार करताना दिसून येत आहेत, शहरात आल्यानंतर ते आपल्याला खरोखरच मतदान करतील का? याचा अभ्यास पण उमेदवार करीत असल्याचे चित्र सध्या सेलू शहरात दिसत आहे.या लोकांना मतदानासाठी दरवर्षी काही उमेदवार निश्चित घेऊन येत असतात त्यामुळे बाहेर गेलेले मतदार सुद्धा आप आपल्या प्रभागातील उमेदवारांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत बाहेरील मतदार कोणाला कौल देणार हे पाहणे गरजेचे आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page