Friday, December 12, 2025
HomeHealth & Fitnessजिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन लोगोचे लोकार्पण
spot_img

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन लोगोचे लोकार्पण

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन लोगोचे लोकार्पण

चंद्रपूर( जीमाका) : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने आज नवीन अधिकृत लोगोचे लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी  कार्यालयातील तांत्रिक व आस्थापना  विभागांतील अधिकारी  व कर्मचारी  उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेत, उत्तरदायित्वात आणि नागरिकाभिमुख सेवेत सातत्याने  होत असलेल्या सुधारणा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा नवीन लोगो विभागाच्या ओळखीला नवी  दिशा देणारा ठरेल, असे मत डॉ. अशोक कटारे, यांनी व्यक्त केले. नवीन लोगोमुळे जिल्हा आरोग्य विभागाची  एक वेगळी ओळख निर्माण होउन यामुळे विभागाची कार्यसंस्कृती, दृष्टीकोन आणि जनतेशी असलेली बांधिलकी अधिक स्पष्टपणे दृश्यमान होईल. या उपक्रमामुळे विभागाची प्रतिमा अधिक बळकट होईल, असा विश्वास विभागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार डॉ. किशोर भट्टाचार्य  यांनी  केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page