Jyotsna Wankhede:
मराठा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर, द्वारा संचालित हिंग्लाज भवानी हायस्कुल, बाबुपेठ, चंद्रपूर येथिल आद. मुख्याध्यापिका कु. निर्मला बापून्याजी मेहरकुरे ह्या आपल्या प्रदीर्घ कालच्या सेवेतून दि. 30/11/2025 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी त्यांनी शाळेत अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून शाळेला प्रगतीपथावर नेले. त्यांनी 1999 पासून तर 2025 पर्यंत एकूण 26 वर्ष मुख्याध्यापिका पदाचे कार्य यशस्वी पार पाडले. तेव्हा त्यांच्या सेवापुर्तीचा सोहळा मोठया थाटात करण्यात आला, या प्रसंगी मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान. श्री संजयराव कोटकर, मुख्याध्यापक संघ चंद्रपूर, च्या माजी अध्यक्षा सौ. संध्याताई गोहोकार, माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई दूधपाचरे, स्थानिक चिकित्सक डॉ. कचरूजी भरडकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. नंदाताई पंधरे व संस्थेचे सदस्य श्री आकाश कोटकर, श्री विकास कोटकर, श्री कुणाल कोटकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचऱ्यांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील आयुष्या करीता उत्तम आरोग्य व सुख समाधानाची कामना केली.
तसेच हिंग्लाज भवानी हायस्कुल बाबुपेठ, येथिल मुख्याध्यापिका सेवानिवृत्त झाले, त्यामुळे त्याच शाळेतील सेवाजेष्ठ, विज्ञान प्रेमी व विज्ञान शिक्षक श्री. संतोष पुरुषोत्तम साठे सर यांना शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक म्हणून मराठा शिक्षक मंडळाच्या सचिवानी पदभार दिला. उपस्थित सर्व मान्यवर व शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुछ देऊन श्री. साठे सर यांचे हार्दिक अभिनंदन केले.