जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे संयुक्त कार्यक्रम
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिव्यांग दिवस साजरा.
मानवाधिकार दिवस सुद्धा साजरा करण्यात आला.
Jyotsna Wankhede:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 10 डिसेंबर 2025 रोजी संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे अलाम सर, सौ. लता साठे, यु. के. रांगणकर सर, इंद्रभान अडबाले यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून शिक्षक यु. के. रांगणकर सर, शिक्षकेतर कर्मचारी इंद्रभान अडबाले, पालक सौ. लता साठे, विद्यार्थिनी विदिशा साठे, राधिका दुधे यांचे गुलाब कळी देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमुख पाहुणे अलाम सर यांनी सांगितले की, प्रत्येक दिव्यांगाला जगण्याचा अधिकार आहे. तसेच मानवाधिकार दिवसाबद्दल माहिती सांगितली.
रांगणकर सर यांनी मानवाधिकार दिवसाबद्दल माहिती सांगितली. दिव्यांग दिवसाबद्दल माहिती सांगून, दिव्यांगाचे हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून दिली.
आपले अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी सामान्य माणसाला शिक्षणाच्या प्रवाहात आले.
दिव्यांग दिवसाबद्दल माहिती सांगताना त्यांनी कथन केले की शासनाने दिव्यांगाना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. प्रत्येक दिव्यांग आत्मबलाने प्रगती करतो आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे मॅडम, आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गणेश चंदावारबाबू, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे तसेच विद्यार्थीगण उपस्थित होते.