Monday, April 20, 2026
HomeIndiaकेंद्रात स्वतंत्र मंत्रालयसाठी जंतर मंतर येथे धरणे आंदोलन.
spot_img

केंद्रात स्वतंत्र मंत्रालयसाठी जंतर मंतर येथे धरणे आंदोलन.

केंद्रात  स्वतंत्र  मंत्रालयसाठी जंतर मंतर येथे धरणे आंदोलन. 

Jyotsna Wankhede:राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेलफेयर असोसिएशन तेलंगणा,आंध्रप्रदेश यांच्या संयुक्तपने सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 ला जंतर -मंतर नवी दिल्ली येथे  आंदोलन करण्यात आले , जातनिहाय जनगणना करण्यात यावी,केंद्रात स्वतःत्र मंत्रालय स्थापित करण्यात यावे, आरक्षणातील 50% मर्यादा हटविण्यात यावी, 13 सप्टेंबर 2017 पासून क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्यात आली नाही ती वाढविण्यात यावी,  संविधानाच्या कलम 243 डी (6) व फलम 243 टी (6) मध्ये सुधारणा करून स्थानिक स्वराज संस्थेतील ओबीसींना 27 टक्के आरक्षणाचा कायदा करावा,केंद्र सरकारच्या सर्व विभागातील ओबीसी संवर्गातील राखीव 27% जागा पूर्णतः  भरण्यात याव्यात,  महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावा. ओबीसीसाठी लोकसभा व विधानसभा असे स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करण्यात यावेत, ओबीसी प्रवर्गाचा अॅट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा.  केंद्र सरकारने वार्षिक अंदाजे पत्रक तयार करतांना एससी, एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गाकरिता लोकसंखेच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी,  या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार वड्डीराजू रविचंद्र, खासदार मालू रवी, माजी राज्यसभा खासदार रापलू आनंद भास्कर , महेश कुमार गौड,माजी मंत्री  श्रीनिवास गौड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर , श्रीनिवास जाजूला अध्यक्ष बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगाना , बीसी वेल्फेअर असोसिएशन आंध्रप्रदेश अध्यक्ष शंकरअण्णा , दिनेश चोखारे प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ , शिवप्रसाद शाहू दिल्ली प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,विक्रम गौड , डॉ मुकेश पुडके , अंबादास मंदुरकर, डॉ सुरेश कापरे, कल्याण ,पंडित राठोड नांदेड,रविंद्र वाणीधुळे,नंदकुमार चव्हाण रत्नागिरी यांचे सहित राष्ट्रीय ओबीसी महासंघ,बीसी वेलफेयर असोसिएशन तेलंगणा & आंध्रप्रदेश चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page