Wednesday, February 11, 2026
HomeEducationउप्परवाही येथे 1998- 99 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन संपन्न
spot_img

उप्परवाही येथे 1998- 99 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन संपन्न

उप्परवाही येथे 1998- 99 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन संपन्न

ज्योत्स्ना वानखेडे:
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उप्परवाही (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) येथे इ.स. 1998–99 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास आद. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आनंद धुर्वे , श्री. आनंदराव माथुलकर, श्री. नागेश्वर भटपल्लीवार, श्री. धनंजय शास्त्रकर तसेच श्रीमती विमल भगतकर मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व मान्यवर शिक्षकांचा शॉल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या विशेष प्रसंगी माजी विद्यार्थी श्री. नथ्थू मत्ते यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत “शिक्षणाचा आनंद” हे मराठी पुस्तक प्रकाशित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस अलमारी (भेटवस्तू) व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गिरीधर पानघाटे यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक श्री. गणेश निमगाडे, श्री. प्रफुल्ल चिवाने, श्री. संदीप मडावी व श्री. माधव ढाकणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन  सौ. सगुणा लोनगाडगे, सौ. आशा लोनगाडगे, सौ. गोपिका परसुटकर, सौ. सुरेखा तलांडे, धनराज पिंपळशेंडे, नीलकंठ कोंगरे, नथ्थू मत्ते, साईनाथ सिडाम, राजेंद्र मडावी, अनिल बोंडे, राहुल उपगणलावार, रविंद्र पेगडपल्लीवार व किशोर पानघाटे तथा  सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून  संपन्न केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page